Followers

Followers

Sunday 6 November 2022

निफ्टी अंदाज दि. ०७/११/२०२२ ते दि. ११/११/२०२२


 निफ्टी अंदाज दि. ०७/११/२०२२ ते  दि. ११/११/२०२२ 

    गेल्या आठवड्यात निफ्टी  साठी जो अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला त्यात ५०% यश मिळालं. एक मंदी ची अपेक्षा होती ती काही पूर्ण होताना दिसली नाही levels  १००% काम केल्या असो, येत्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया . 


१: निफ्टी चा चार्ट daily candle  चा ठेवावा . 


२: निफ्टी  चा मूळ ट्रेंड हा positive  आहे . 


३: बारकाव्याने  जर चार्ट चे निरीक्षण केले तर दि. ०२/११/२०२२ रोजी जी candle  बनली आहे ती bearish  engulf  या प्रकारची आहे . 


४: येत्या आठवड्यात मंगळवारी म्हणजेच दि. ०८/११/२०२२ रोजी मार्केट ला सुट्टी आहे . 


५: साध्याच मार्केट structure  आणि मंगळवारची सुट्टी विचारात घेता rangebound  दिसून येत . पण या कालखंडानंतर थोडा तेजीचा विचार करावा लागेल . 


६: निफ्टी मध्ये काम करण्यापेक्षा stock  specific  काम कारण गरजेचं . 


७: tata steel  सध्या १०५ रु च्या आसपास असणारा स्टॉक trading  आणि investment  दोन्ही बाजूनी चांगला दिसून येत आहे यात एक तेजी बनेल हा stoploss   चा वापर कारण तितकंच  महत्वाचं . 


८: निफ्टी  मध्ये नव्या तेजी साठी दि. ०२/११/२०२२ चा high  तोडणं गरजेचं हा high  काढल्यावर मात्र १८४२५ चे दरवाजे निफ्टी साठी open  होत आहेत .


९:बाकी stock  जसे ओपन होतील तसे status ,  Facebook  आणि  telegram  वर टाकतो आहेच .


Technical Hunting

लेखक: श्री. शंतनु पोतनीस

कोल्हापूर


स्टॉक मार्केट च्या update तुमच्या WhatsApp  वर हवे असतील तर सोबतचा  फॉर्म भरावा 


form link 👉 https://forms.gle/9dz8dgTe7WB6RGqq7


Telegram  link: https://t.me/technicalhuntingstockmarket  

Sunday 30 October 2022

निफ्टी अंदाज दि. ३१/१०/२०२२ ते दि. ०४/११/२०२२

 

  गेल्या लेखात म्हणजेच दि. १७/१०/२०२२ च्या लेखाप्रमाणे ज्या गोष्टींचा अंदाज बांधला होता त्याला १००% यश मिळालं . मागच्या आठवड्यात लेख लिहायची गरज भासली नाही कारण दिवाळी पर्यंतचे टार्गेट आधीच बांधले होते ते दिवाळीत पूर्ण झाले गेल्या आठवड्यात trading  साठी दिवस पण कमी होते त्याच प्रमाणे जवळपास २ वर्षांनी दिवाळी मुक्तपणे साजरी होत होती त्यामुळे सगळीच माणसं  त्या धामधुमीत होती trader  आणि मार्केट मेकर्स तरी त्याला कसे अपवाद असणार असो, येत्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया . 


१: निफ्टी चार्ट daily  candle  चा ठेवावा . 


२: गेले काही दिवस निफ्टी high  volatile  चाल दाखवताना दिसून येत आहे . 


३: मूळ ट्रेण्ड  हा uptrend  आहे . त्यात शंका नाही daily  candle  बघता शांतता जरी वाटत असली तरी intraday  trading  करताना जी movement  बाजारात सध्या चालू आहे ती हाताळणे म्हणजे तारेवरची कसरत आणि मेंदू ला खाद्य तसेच विचारांची परीक्षा असंच  म्हणावं लागेल . 


४: zig  zag  स्वरूपाची चाल सध्या निफ्टी दाखवत आहे . 


५: १७७८६ पाशी सध्याचे closing  दिसून येत आहे आणि त्यापाशी लगेच कोणता resistance  दिसून येत नाही . १८००० ते १८१०० दरम्यान एक level  आहे म्हणजे आजून ३०० ते ३५० पॉईंट ची movement  मिळू शकेल . 


६: तिथून मात्र एक correction  अपेक्षित आहे . ते साधारण १७४५० ते १७७०० दरम्यान दिसून येत आहे आणि या level  पासून जो bounce  बघायला मिळेल तो nifty  ला १८४०० पर्यंत घेऊन जाईल यात शंका नाही तर खात्री वाटते . 


७: पण या झाल्या फार पुढच्या गोष्टी हे सर्व ठोकताळ्याप्रमाणे होण्यास साधारण २० ते २५ दिवस लागतील पण आपला view  आज दि. ३१/१०/२०२२ ला तयार आहे आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे . 


८: येत्या आठवड्यापुरता विचार केला तर तेजीचाच विचार आहे . निफ्टी मध्ये बोलायचं झाल्यास फार Gapup  झालं तर सावध काम करावं लागेल . 


९: आठवड्याची सुरवात जरी तेजीने झाली तरी शेवट मात्र मंदीने होईल असा प्राथमिक अंदाज आहे . 


१०: option  बद्दल बोलायचं झालं तर Dec  ending  चा १७७००  आणि १८००० चा CE  कॉल option  निशाण्यावर हवा आपल्या टप्प्यात आला तरच entry  रुपी बंदुकीचा चाप  ओढणं गरजेचं . 


११:बाकी stock  जसे ओपन होतील तसे status ,  Facebook  आणि  telegram  वर टाकतो आहेच .


Technical Hunting

लेखक: श्री. शंतनु पोतनीस

कोल्हापूर


स्टॉक मार्केट च्या update तुमच्या WhatsApp  वर हवे असतील तर सोबतचा  फॉर्म भरावा 


form link 👉 https://forms.gle/9dz8dgTe7WB6RGqq7


Telegram  link : https://t.me/technicalhuntingstockmarket

Sunday 9 January 2022

निफ्टी अंदाज दि . १०/०१/२०२२ ते दि . १४/०१/२०२२


 निफ्टी अंदाज दि . १०/०१/२०२२ ते दि . १४/०१/२०२२


गेल्या आठवड्यात निफ्टी साठी जो अंदाज बांधला होता तो ५०% चुकला असं म्हणावं लागेल मूळ trend  negative  असल्याने विचार मंदीचा होता आणि short  term  trend  हा positive  असल्याने संधी मिळाल्याशिवाय short  चा  विचार नव्हता तर शॉर्ट ची संधी काही मिळाली नाही आणि nifty  ने bounce  दाखवला 

असो, येणाऱ्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया . 


१: nifty चा chart daily candle चा ठेवावा. 


२: short term trend हा positive दिसून येतो. 


३: सध्याचा nifty  बद्दल विचार हा positive  आणि range bound  राहील असा आहे 


४: हि range  साधारण १७५०० ते १८२०० पर्यंत असेल . 


५: प्राथमिक विचार हा positive  असल्याने निफ्टी जर १७८०० ते १७९०० या दरम्यान open  झाली आणि जास्त मोठी movement  न करता १७९०० break  करू लागली तर एक positive  trade  मिळेल जो निफ्टी ला १८१०० ते १८२०० पर्यंत घेऊन जाऊ शकतो . 


६: जर ठरल्याप्रमाणे nifty  चाल दाखवू  लागली तर १७९०० चा CE  चा विचार करणे गरजेचे . 


७: stock  specific  विचार केला तर Dr . reddy  मध्ये एक फायद्याची संधी आहे . 


८: बाकी stock  जसे ओपन होतील तसे status ,  facebook  आणि  telegram  वर टाकतो आहेच .


Technical Hunting

लेखक: श्री. शंतनु पोतनीस

कोल्हापूर


Telegram  link : https://t.me/technicalhuntingstockmarket


स्टॉक मार्केट बद्दल चे अश्या प्रकारचे लेख तुम्हाला पर्सनल whatsapp वर हवे असतील तर


 whatsapp लिंक :https://bit.ly/2YgBbTe

निफ्टी अंदाज दि. ०३/०१/२०२१ ते दि. ०७/०१/२०२१


निफ्टी अंदाज दि. ०३/०१/२०२१ ते दि. ०७/०१/२०२१

         २०२२  सालामधील हा पहिलाच लेख त्यापूर्वी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . सर्वांच्या नवीन  वर्षाच्या मनोकामना तसेच संकल्प  पूर्णत्वास जावोत अशी  महालक्ष्मी चरणी प्रार्थना ...... 

          गेल्या आठवड्यात निफ्टी साठी जो अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला होता त्याला १००% यश मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही प्राथमिक अंदाज हा negative  जरी असला तरी आठवड्याचे closing  positive  होईल असा अंदाज होता तो पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे असो , येणाऱ्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया . 


१: निफ्टी चा चार्ट daily  candle  चा  ठेवावा . 


२: निफ्टी चा मूळ ट्रेण्ड  negative  आहे आणि शॉर्टटर्म ट्रेण्ड  positive  असल्याचे दिसून येत आहे . 


३: nifty  चे structure  बघता एक bounce  नंतर थोडी range  आणि पुन्हा negative  असा दिसून येत आहे . 


४: गेल्या आठवड्यात अपेक्षा केल्याप्रमाणे चाल दाखवली आहे . त्यामुळे तेच analysis continue  केलं तर पुन्हा एक  पडझड अपेक्षित आहे . 


५: येणाऱ्या events  चा विचार करता म्हणजे oct -nov -dec  या  quarter  चे result  तसेच येणाऱ्या budget  चा विचार करता nifty  ची चाल range  bound  असेल . 


६: option  मार्केट चा  विचार करता १७३५० आणि १७१५० या दोन्ही PUT  option  कडे लक्ष हवे येणाऱ्या ६ तारखेच्या expiry  साठी या मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे . 


७: stock  specific  बोलायचं झाल्यास nestle  या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट च्या हिशोबाने विचार करणे गरजेचे सध्याचा भाव १९७०५ चालू आहे . TH च्या विद्यार्थ्यांना या मध्ये बिनधास्त entry  करावी असे गेल्या आठवड्यात सुचवले आहे . 

Sunday 28 January 2018

Fountainhead

"ब्लॉग" लिहायचा विचार बरेच दिवस मनात घोळत होता .
त्याच कारण असं शेयर मार्केट चा अभ्यास तर चालूच आहे. अधून मधून फेसबुक वर पोस्ट टाकत असतो, पण ऑफिशिअल ठिकाण नव्हतं जिथं सगळ्यांना कधीही वाचता येइल. ब्लॉग लिहायच्या commitment ने मार्केट चा आणि technical analysis चा जास्ती अभ्यास होईल. आणि लोकांनासुद्धा फायदा होईल .अजूनही स्टॉक मार्केट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं नाही, त्याकडे आजून जुगार म्हणूनच बघितला जातं पण तसं नाही एवढच आत्ता सांगतो.
                  संस्कृत मध्ये म्हण आहे "अति सर्वत्र वर्जयेत" .
   

     स्टॉक मार्केट मध्ये रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत अथांग समुद्रा प्रमाणे याचा आवाका आहे. माणसाचं  आयुष्य देवाण-घेवाण (business) या सूत्रावर चालत आणि हे सूत्र अतिशय basic आहे,याला टाळून आपण जिवंत नाही राहू शकत. तर अश्या या व्यापाराच्या विषयातील थोडासा पण महत्वाचा भाग म्हणजे शेयर मार्केट जो अथांग आहे पण समजून घेतला आणि समजावून सांगितलं तर अतिशय सोपा आणि श्रीमन्तीचा दरवाजा उघडणारा.
    मला आठवतं तसं २००१ ला world trade center वर अतिरेकी हल्ला झाला होता तेंव्हापासून स्टॉक मार्केट मी बघतोय साधारण १६-१७ वर्ष झाली , शाळेतून नुकताच घरी आलो होतो TV वर बातम्या चालू होत्या अमेरिकेवर वर हल्ला world trade center वर विमान धडकावल्याचे video आणि news . बाबांची चर्चा चालू होती उद्या मार्केट पडणार ...
    त्याआधीही घरी चर्चा व्हायची साधारण १९९८-९९ असेल रेडिओ वर संध्याकाळी ६ वाजता बातम्या लागायच्या बाबां आणि त्यांचे मित्र त्या बातम्या ऐकत मार्केट बद्दल चर्चा करायचे पण खरी curiosity २००१ पासून सुरु झाली त्याला तसं कारण पण होतच याच वर्षी केतन पारेख यांचं scam उघडकीस आलं. त्याच्या कहाण्या तर अश्या कि दुपारचं जेवण करण्यासाठी केतन त्यांच्या office मधून हेलिकॉप्टर ने घरी जायचे (लहान मनात खूप काही विचार यायचे ..... हा हाः ) माझ्या लहान मनाला खूप प्रश्न पडायचे, सुदैवाने त्याची उत्तर घरातूनच मिळायची. 
     इकॉनॉमिक टाइम्स मध्ये रोज शेयर चे पानच्या पान भरून भाव यायचे त्यावेळी आता सारख एव्हडं फास्ट online trading सगळीकडे  नव्हतं ब्रोकरच्या ऑफिस मध्ये जाऊन बसावं लागत असे.  त्या बद्दल deep  माहिती पुढील काही लेखात आपण घेणारच आहोत.  
     असो , याचं  कालखंडात ब्रोकेरज म्हणजे काय ? सर्किट लागणे म्हणजे काय ? अशी खूप खूप  माहिती मिळायची शाळेच्या शिक्षणात सुद्धा फार मन लागत नव्हतं . गणितात जास्ती मार्क नाही मिळाले पण percentage काढणं आणि व्यावहारिक गणित आपोआप फास्ट होत गेलं . ज्या गोष्टीची भूक असते ती गोष्ट माणूस पटकन शिकतो ...
                रोज पेपर (न्युज पेपर ) वाचणं , माहिती घेणं आपोआप होत होतं आणि मी माहिती मिळवत गेलो !
      २०१० मध्ये technical analysis असा प्रकार असतो असं समजलं, ठाण्याच्या  श्री. अभिजीत जोशी (सर) यांनी कोल्हापुरात २ दिवसाचे workshop घेतल होत. त्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या बाकी नंतर सेल्फ स्टडी, जो अजूनही चालूच आहे.
     ब्लॉग लिहायचा उद्देश हाच कि हे सगळे अनुभव share व्हावेत, यात आपण technical analysis basic to  advance शिकणार आहोत जे सोप्या आणि मराठी भाषेमध्ये लिहणार आहे overall market बद्दल तसेच काही trade सुद्धा लिखाण करायचा विचार आहे.  ज्याने earning सुद्धा होईल आणि लिहायचं म्हंटलं कि माझाही अभ्यास जोरात होईल commitment केली असेल तर trade आजून परफेक्ट काढले जातील स्वार्थ आणि परमार्थ आहेच !
      तर ब्लॉग लिहायची संकल्पना आवडली असेल तर जरूर कळवा आणि ब्लॉग आवडला असेल तर share सुद्धा करायाला विसरू नका  जेवढे जास्ती लोक वाचतील तेव्हडा जास्ती हुरूप येईल, आणि माझ्याकडून जोरदार काम होईल .

*टीप : तुमच्या suggestion चे स्वागत आहे,